बदल हा निसर्गाचा नियम आहे : गरज डिजिटल होण्याची

ग्रामीण भागात “डिजिटल” असे काही शब्द कानावर पडले की एकच चित्र मनामध्ये तयार होते ते म्हणजे की असा काहीतरी जे आपल्याला नाही कळेल किव्हा जे आपल्यासाठी नाहीच. हे असा का होते, याच एक प्रमुख कारण म्हणजे “भाषा”, डिजिटल आहे म्हणजे शक्यता आहे की ते इंग्रजी मधेच असेल, परंतु असे नाही. भाषेचा आणि डिजिटल असण्याचा जास्त संबंध नाही. डिजिटल होणे म्हणे आजकाल च्या तंत्रज्ञानाशी एकरूप होणे. तंत्रज्ञानाची कोणतेही भाषी नसते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास डिजिटल होणे किव्हा तंत्रज्ञासाही जुळवणूक करून घेणे म्हणजे जे काम आपण परंपरागत रीतीने करत आलेलो आहोत तेच काम करताना आपला वेळ आणि श्रम कमी करणे. मूलतः तंत्रज्ञान यासाठीच बनले आहे किव्हा ते बनवण्यामागे हाच एक मुख्य उद्देश असतो. आजच्या डिजिटल इंडिया चा काळात आपल्या प्रत्येकामध्ये थोडे थोडे बदल जरी घडले तरी त्याचा चांगला परिणाम दिसेल, त्यासाठी तंत्रज्ञानाचा पूरक उपयोग महत्वाचा आहे.
 
“माझा भारत देश हा खरंतर बऱ्याच देशांमध्ये सॉफ्टवेअर तंत्रज्ञ/सेवा पुरविणारा देश आहे, शक्यतो याच तंत्रज्ञाचा उपयोग करून कित्तेक देश आपली प्रगती करत आहेत, मोठमोठ्या कंपनीच्या प्रमुख पदावर आपले भारतीय आहेत. अशी परिस्तिथी असताना सुद्धा तंत्रज्ञानाचा नेमका भारतात किती वापर होतो? कित्तेक शाळा/कॉलेज, दवाखाने, दुकाने, हॉटेल्स अजूनही डिजिटल झाल्या नाहीत. याचं कारण म्हणजे माहितीचा अभाव. माहिती ज्याच्याकडे तो समर्थ असेल. डिजिटल इंडिया यामुळे हेच साध्य होऊ शकते. आपण प्रत्येक जण समर्थ झालो तरच माझा देश समर्थ होऊ शकतो.”
 
समाजामध्ये विशेषतः लहान मुलांना सकारात्मक आणि योग्य अशी माहिती पुरवणे यासाठी डिजिटल माध्यम हे प्रभावी साधन आहे. शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेची गरज आहे. माझा भारताचे प्रगतिशील भविष्य हे या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आहे. डिजिटल संवादाच्या माध्यमातून विध्यार्थी , पालक आणि शिक्षक यांच्यातील दुरावा कमी होऊन चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक शाळा पुढाकार घेऊ लागल्या आहेत. यामध्ये अधिकाधिक विद्यार्थी व पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी शाळा स्तरावर आणखी प्रयत्न होण्याची गरज आहे.
शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी-शिक्षक-पालकांमधील अंतर कमी होणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमे व अ‍ॅपच्या माध्यमातून हे अंतर कमी होणार आहे. पालकांचा दृष्टिकोनही बदलत असून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पालकांचे चांगले सहकार्य मिळू लागले आहे.
 
“शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारे संवाद होण्याच्या दृष्टीने अ‍ॅपसह इतर डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर होऊ शकतो. इतर शाळांमध्येही अशा माध्यमांचा वापर वाढणे आवश्यक आहे. ‘अ‍ॅप’सारख्या डिजिटल माध्यमातून पालकही शाळेशी थेट जोडले जातील. शाळेकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभ्यासासाठी संबंधित घडामोडी घरबसल्या सहज कळतील. याचा सर्वांना फायदा होईल. त्यामुळे याचा वापर वाढयला हवा.”
 
मातृभाषेतून शिक्षण दिल्याने मुलांची तंत्रज्ञान क्षमतादेखील विकसित होते. सध्याच्या शिक्षणपद्धतीत नवीन व कल्पक बदल घडवणे आवश्यक आहे. इंटरनेट चा आजकालच्या मुलांवर थेट परिणाम होत असतो. त्यासाठी डिजिटल स्कूल ही संकल्पना अमलात आणले पाहिजे. आज जग बदलत आहे, आपल्यालासुद्धा त्याप्रमाणे बदलण्याची गरज आहे. त्यामुळे एखादी गोष्ट त्या मुलांना लवकर समजते.
 
डिजिटल होणे म्हणजे फारसं काही वेगळं करणे नाही, डिजिटल होणे म्हणजे एखाद काम करताना आपला आपला अमूल्य वेळ, श्रम वाचवणे. यासाठी गरज आहे फक्त आपल्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची. आपल्या दैनंदिन सवयीमुळे आपली मानसिकता अशी बनलेली असते की नवीन काही आत्मसात करण्यास ती संकोच करते. पण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि आपण सर्व निसर्गाचा भागच आहोत.
 
सागर वझरकर
  संस्थापक आणि सीईओ
  एससॉफ्ट ग्रुप इंडिया
 

व्यवसाय आणि जाहिरातीचा संबंध

आपलं व्यावसायिक नेटवर्क खूप लहान असेल तर त्यात आपण किती काळ खेळत बसणार? आपल्याला आवश्यकता असते ती नेटवर्क वाढवण्याची. ते वाढलं की आपलं कार्यक्षेत्र नक्की वाढते.

पण नेटवर्क कसं वाढवावं?
व्यावसायिक कोणताही असो मग तो उत्पादन (प्रॉडक्ट) क्षेत्रातील असो किंवा सेवा (सर्विस) क्षेत्रातील त्याला त्याच्याकडे असलेली सेवा/उत्पादन विकण्यासाठी ग्राहकांची आवश्यकता असतेच. आणि योग्य ग्राहक शोधण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. आणि याचसाठी आवश्यकता असते जाहिरातीची.

जाहिरात कशी असायला हवी? आणि ती का करावी?
असे प्रश्न आपल्याला असतात. बऱ्याच लोकांचे जाहिराती विषयी खूप गैरसमजही असतात त्यामुळे आपल्या उत्पादनाची/सेवेची जाहिरात करण्याच्या बाबतीत व्यावसायिक पाहिजे तेवढा आशावादी नसतो.

ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातील एक सक्षम संवादाचे माध्यम ‘जाहिरात’ असते. अगदी कमी शब्दात पण आकर्षक पद्धतीने ग्राहकाला खरेदी करण्यास भाग पाडणे हे एक चांगल्या जाहिरातीचे वैशिष्ट्य असते.

आजच्या आधुनिक काळात जाहिरातीचे अनेक प्रकारची माध्यमे/संसाधने उपलब्ध आहेत. त्याचा योग्य ठिकाणी वापर करण्याची आवश्यकता असते.

जाहिरात करायलाच हवी का?
आजच्या स्पर्धात्मक बाजारात टिकून राहण्यासाठी आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवण्याची करण्याची गरज असते. त्यासाठीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश सतत पोहोचवला पाहिजे. आपल्या उत्पादनाबद्दल/सेवे बद्दल लोकांना माहिती द्यायला हवी. सतत लोकांच्या नजरेसमोर राहणे गरजेचे असते, लोकांच्या कानावर/दृष्टीक्षेपात आपल्या बद्दल काही ना काही पडत राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जाहिरात करणं अनिवार्य आहे.

जाहिराती मुळे लोकांना आपली ओळख होत राहते आणि ते आपल्याला ओळखू लागतात. जेव्हा ग्राहकांच्या मनावर आपलं नाव कोरलं जातं तेव्हा आपोआप त्यांच्या माध्यमातून आपली प्रसिद्धी होवू लागते आणि नेटवर्क वाढत जावून आपलं नाव होवू लागते. ही जाहिरातीची मोठी ताकद असते.

बऱ्याच नावाजलेल्या कंपन्या आहेत परंतु तरीही त्या करोडो रूपये खर्च हा केवळ जाहिरातींवर करत असतात. कारण जर यांनी आपली जाहिरात करणं बंद केलं तर लोकांच्या नरजेपासून ते दूर जातील आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी लोकांची बाजारपेठेत मक्तेदारी वाढेल. त्यामुळे प्रसिद्धिसाठी त्यांना स्वत:ची जाहिरात नेहमी करत रहावीच लागते.

जाहिरातीवर – एक गुंतवणूक.
जाहिरातीवर होणार खर्च हा अनेकांना जाहिरात करण्यापासून रोखणारा पहिला आणि मोठा अडथळा आहे. पण प्रत्येक व्यावसायिकाने जाहिरातीवर होणार खर्च एक गुंतवणूक समजून आपले अंतीम लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वत:ला पोहोचवण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी तयार करणे गरजेचे असते. जाहिरातींबद्दल गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘जाहिरातींची’ गुंतवणूक करावी.

                                                                                        सागर वझरकर
                                                                                          संस्थापक – सीईओ
                                                                                          एस सॉफ्ट ग्रुप इंडिया